Sunday, 12 August 2018

दोरीवरील उड्या मारणे


          विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना मिळते , शारिरीक विकास, भावनिक विकास होतो. बुध्दी तल्लख बनते. शरीर नियंत्रण ठेवण्यास वाव मिळतो.

शाळेत मुलांचे वाढदिवस साजरे करणे.


          शाळेतील प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा दिल्या जातात. त्याचा सामाजिक व भावनिक विकास होण्यास मदत होते.
          काही पालक या दिवशी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. पुस्तके भेट देतात. प्रत्येकाला आपला वाढदिवस दिन विशेष सारखा वाटतो.

स्वंय अध्ययन कार्ड


          या कार्डामुळे मुले स्वतः वजाबाकीचे उदा. तयार करतात.गटनायक ती तपासतो. प्रत्येकाला संधी मिळते.
वर्ग नियंत्रण ठेवण्यास सोपे जाते. स्वनिर्मितीचा आनंद मुलांना मिळतो. गणिती क्रिया जलद करतात.

Saturday, 28 July 2018

वन भोजन



           जर वर्षी श्रावण महिन्यात विद्यार्थ्यांमध्ये परिसर भेट अंतर्गत वनभोजन हा उपक्रम राबविला जातो . यामुळे मुलांमध्ये परीसराचे निरीक्षण , सामाजिक विकास , शारीरिक विकास होण्यास मदत होते.

Running A Garden Of Words


               सदर उपक्रम हा इंग्रजी विषयातील वाचन व अर्थपूर्ण वाक्यरचना तयार कण्यासाठी नवोपक्रम तयार केला आहे. मुले आनंददायी वातावरणात स्वंय अध्ययन करतात.इंग्रजी विषयाची भिती दूर होते.टाकाऊ तेल रंगाचे डबेवापरुन टिकाऊ मजबूत साहित्य करताना नवनिर्मीतीचा आनंद मिळाला. हे साहित्य मुलांना हाताळण्यास सोपे आहे.

बोलक्या भिंती


                 सदर उपक्रम राबविण्यासाठी, शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी स्वतः बोलक्या भिंती तयार केल्या आहेत.वाटर कलरच्या सह्याने चित्रे रेखाटन करून रंगविली, त्यामुळे स्वनवनिर्मीतीचा आनंद मिळाला. मुलांचे शब्दभांडार वाढले. चित्र वर्णन, अभिव्यक्ती, प्रश्न कौशल्यांना वाव मिळाला.

तंबाखू मुक्त शाळा


                   सदर उपक्रम राबविण्यासाठी शाळेत प्रबोधनपर कार्यक्रम राबविल्यामुळे जनजागृती, प्रबोधन होण्यास मदत मिळाली, तसेच मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला.